![]() |
d l ed First Year Admission 2022 डी एल एड प्रथम वर्ष प्रवेश २०२२ |
डी एल एड प्रथम वर्ष प्रवेश २०२२
{tocify} $title={Table of Contents}
प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्यस्तरीय केंद्रीय पद्धतीने केले जातात. शासकीय कोट्यातील प्रथम वर्षाच्या एकूण प्रवेशक्षमतेपैकी ७०% जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संबंधित विभागीय शिक्षण मंडळनिहाय गुणवत्तेनुसार विभागीय स्तरावर व ३०% जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतर विभागीय शिक्षण मंडळातील राज्यस्तरीय गुणवत्तेनुसार भरण्यात येतात.
डी एल एड प्रथम वर्ष प्रवेश अर्ज भरण्यासंबंधी सूचना २०२२-२३
- उमेदवाराने डी एल एड प्रथम वर्ष साठी प्रवेशासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/ जावे प्रवेशाबाबत ची नियमावली प्रवेश अर्ज भरण्याबाबत च्या सूचना अर्ज भरणे अगोदर काळजीपूर्वक वाचाव्यात.
- यात संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील d.el.ed यावर क्लिक करावे.
- यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात कॉलेज प्राचार्य किंवा अध्यापक विद्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांचा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकू नये.
- एका ईमेल आयडीवर फक्त एकच विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकेल विद्यार्थ्यांनी स्वतःचा ई-मेल आयडी व पासवर्ड अन्य व्यक्तीस देऊ नये.
- रजिस्ट्रेशन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला स्वतःचा यूजर आयडी मिळेल या यूजर आयडी द्वारे उमेदवार स्वतःचा लॉगीन मध्ये प्रवेश करू शकेल यूजर आयडी जतन करून ठेवावा प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत याचा उपयोग होणार आहे.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःची मूळ प्रमाणपत्रे सोबत ठेवावी त्या त्या ठिकाणी सदरची प्रमाणपत्र उमेदवाराने अपलोड करावीत.
- प्रवेश अर्जात उमेदवाराने सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
- प्रवेश अर्जासाठी शुल्क खुला संवर्ग साठी २०० रुपये खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग साठी १०० रुपये फक्त
- सदर शुल्क क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा आरटीजीएस द्वारे ऑनलाइन भरावे लागेल.
- उमेदवाराने किमान तीन आणि जास्तीत जास्त पाच अध्यापक विद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यावेत एखाद्या माध्यमाची अध्यापक विद्यालय उपलब्ध नसल्यास जेवढी उपलब्ध असतील तेवढे प्राधान्यक्रम भरावेत.
- उमेदवारास त्यांनी दिलेल्या अध्यापक विद्यालयाचे प्राधान्यक्रमानुसार व गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल उदाहरणं प्रथम प्रधान याचा प्रथम विचार केला जाईल प्रथम क्रमांकाच्या कॉलेजसाठी गुणवत्तेप्रमाणे प्रवेश मिळत नसल्यास अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या प्राधान्य देण्याचा विचार केला जाईल.
- उमेदवाराने प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर त्यास अर्जात भरलेली माहिती कोणताही बदल करता येणार नाही.
- उमेदवार एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करू शकतात परंतु त्यासाठी त्यांचे स्वतंत्र शुल्क भरणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने संपूर्ण भरलेली प्रवेश अर्जाची प्रिंट घ्यावी.
अशा प्रकारे प्रवेश अर्ज भरून आपण जतन करून ठेवावे.
{getButton} $text={रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा} $icon={link} $color={Hex Color}
महत्त्वाची माहिती
क्रमांक | लिंक |
---|---|
1 | अध्यापक विद्यालयांच्या नोंदणीबाबत सूचना |
2 | डी .एल.एड. नियमावली |
3 | महत्त्वाच्या तारखा आणि मुदती |
महत्त्वाच्या तारखा आणि मुदती
ऑनलाईन अर्ज भरणे खालील वेळापत्रका प्रमाणे होईल. विद्यार्थ्यांनी कृपया याची नोंद घ्यावी
क्रमांक | कार्यक्रम | प्रारंभ तारीख (YYYY-MM-DD) | शेवटची तारीख (YYYY-MM-DD) |
---|---|---|---|
1 | ऑनलाईन अर्ज | 23 June 2022 | 07 July 2022 |
2 | प्रमाणपत्रे पडताळणी (ऑनलाइन पडताळणी) | 23 June 2022 | 08 July 2022 |
3 | तात्पुरती गुणवत्ता यादी | 11 July 2022 | - |
4 | तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये आक्षेप असल्यास नोंदवीणे. | 11 July 2022 | - |
5 | अंतिम गुणवत्ता यादी | 13 July 2022 | - |
6 | प्रवेश यादी (प्रथम फेरी) | 14 July 2022 | - |
7 | प्रत्यक्ष अध्यापक विद्यालयात प्रवेश | 14 July 2022 | 18 July 2022 |
8 | दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवाराला विकल्पात बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील. | 19 July 2022 | - |
9 | प्रवेश यादी (दुसरी फेरी) | 21 July 2022 | - |
10 | महाविद्यालयात प्रवेश (दुसरी फेरी ) | 21 July 2022 | 25 July 2022 |
11 | तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवाराला विकल्पात बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील. | 26 July 2022 | - |
12 | प्रवेश यादी (तिसरी फेरी) | 28 July 2022 | - |
13 | महाविद्यालयात प्रवेश (तिसरी फेरी) | 28 July 2022 | 01 Aug 2022 |
प्रवेश अर्ज शुल्क
# | तपशील | रक्कम |
---|---|---|
1 | ऑनलाईन प्रवेश अर्ज शुल्क | रु. 200 / - खुला संवर्ग रु. 100 / - खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग |