![]() |
12th result state board Maharashtra held on 03 august |
इयत्ता १२ चा निकाल लागणार ३ ऑगस्ट रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर ,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेत स्थळ वर मंगळवार दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहिती प्रत प्रिंट घेता येईल
HSC 2021 EXAM निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण
अधिकृत संकेतस्थळ खालील प्रमाणे आहेत खालीलपैकी कोणत्याही लींक वर आपण क्लिक करून आपला रिझल्ट दुपारी चार वाजे नंतर बघू शकता .
अधिकृत लिंक खालील प्रमाणे आहे.
लिंक १ - http://hscresult.11admissionadmission.org.in/
लिंक-२ https://msbshse.co.in/
लिंक -३ - http://hscresult.mkcl.org/
लिंक ४- http://maharesult.nic.in/
लिंक ५- https://lokmat.news18.com/
seat न. हरवलाय मग येथे क्लीक् करा https://mh-hsc.ac.in/Search/Search_Student.
(बैठक क्रमांक व आईचे नाव नमूद केल्यानंतर निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.
बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा, तालुक्याची निवड करावी, आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.)
📢 𝐈𝐦𝐩 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐦𝐞𝐧𝐭: The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm. Best of luck to all students. #HSC #results #InternalAssessment @CMOMaharashtra @msbshse pic.twitter.com/kfNBZNGFyh
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 2, 2021
सदर निकालाबाबत चा अन्य तपशील पुढील प्रमाणे
सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार व इयत्ता १० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण , इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इयत्ता १२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परिक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता १२ वी चे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक /अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इयत्ता १२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना विषय निहाय गुणदान करण्यात आले आहे .
सदर गुणदान विचारात घेऊन मंडळाने विविध कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
दिनांक 2 जुलै २०२१ रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेत श्रेणी सुधार योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.
सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधी पैकी या परीक्षेचे गणना करण्यात येणार नाही त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध होतील
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results on 03 august इयत्ता १२ चा निकाल लागणार ३ ऑगस्ट रोजी, how to check 12th result without seat no?