Bridge course (सेतू अभ्यासक्रम) ऑनलाइन उद्घाटन
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सेतू अभ्यासक्रम म्हणजे Bridge course च्या ऑनलाइन उद्घाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण
सुरू राहावे याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या उद्बोधन कार्यक्रम YouTube वर live
प्रसारित करण्यात येणार आहे
दिनांक २८/०६/२०२१ (सकाळी ११ वाजता )
स्थळ YouTube
मराठी ,हिंदी व उर्दू माध्यमाच्या ब्रिज कोर्स डाउनलोड करा https://www.maa.ac.in/index.php?tcf=bridge_course
मागील
वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट
झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम (Bridge course) तयार
करण्यात आलेला आहे
सदर
सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता
मा. ना. वर्षाताई गायकवाड मंत्री (शालेय
शिक्षण विभागमहाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
तसेच
विद्यार्थी अध्ययन सुरू राहावे यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रम सुरू करण्यात
आलेले आहेत या सर्व उपक्रमांची योग्य कारवाई संपूर्ण राज्यामध्ये होणे आवश्यक आहे
यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, व
इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत
महत्त्वाची आहे. या दृष्टीने सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याचा
अनुषंगाने सेतू अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच उदबोधन सत्राचे आयोजन
करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या
क्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,
केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी,
गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी सर्व तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षण
संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता ,विषय
साय्यक ,विषय साधन व्यक्ती, यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे विषयी आदेशित करण्यात आलेले आहे.
खाली YouTube चे video दिलेले आहे.