२०२१ मध्ये दहावीसाठीच्या मूल्यमापन पद्धती (महा एसएससी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांसाठी या परिपत्रकाद्वारे सुचित करण्यात येते की सन 2020 21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी असलेल्या नियमित ,पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत प्रविष्ठ विद्यार्थी यांचे मूल्यमापन बाबत शासन निर्णय पारित करण्यात आले आहे .
मूल्यमापन पूर्ण प्रक्रिया (युट्युब video )
मूल्यमापन कार्यपद्धती परिपत्रक
शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशांनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल
मूल्यांकन परिशिष्ट./तक्ते (download करा )
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी -
तुरळक विषय विद्यार्थ्यांसाठी -
मुख्याध्यापकांनी करावयाची कारवाई
- इयत्ता दहावीचे विषय शिक्षक वर्ग शिक्षक व पर्यवेक्षक यंत्रणा यांची बैठक घेऊन शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे त्यातील निकष व कार्यपद्धती समजून घेऊन सर्वंकष चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करावे.
- मंडळाचे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्प्याचे कामकाज वेळेत पूर्ण करावे.
- मंडळाकडे परीक्षेसाठी आवेदनपत्र भरून नोंदणी केलेल्या व मंडळाची बैठक क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे.
- नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी (संपर्क केंद्रातील) तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांच्या बाबतीत संबंधित विषय शिक्षक वर्ग शिक्षक यांचेकडून मूल्यमापन याबाबत कारवाई करून घेण्यात यावी.
- समितीने प्रमाणित केलेल्या निकाल मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संगणक प्रणालीमध्ये नोंदवावा.
- नियमित विद्यार्थ्यांच्या बाबतीत समितीने प्रमाणित केलेल्या इयत्ता दहावीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत आणि इयत्ता नववीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत सीलबंद पाकिटात मुख्याध्यापकांच्या अभिरक्षेत ठेवून दुसरी प्रत इयत्ता नववी व दहावी संबंधित विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी.
- खाजगी विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याने यापूर्वी इयत्ता पाचवी ते नववी यापैकी जाये त्याची अंतिम परीक्षा पूर्ण केली असेल त्या परीक्षेच्या अंतिम निकालात ची प्रमाणित प्रत उपरोक्त प्रमाणे विभागीय मंडळात सादर करावी
Evaluation methodology for class ten in 2021(maha ssc), २०२१ मध्ये दहावीसाठीच्या मूल्यमापन पद्धती (महा एसएससी)
तुरळक विषय घेऊन शासकीय कर्मचारी पेपरला बसू शकतो का
ReplyDelete