![]() |
Final Results of Maharashtra Pre-Upper and Pre-Secondary Scholarship Exams Declared |
interim of Maharashtra Pre-Upper and Pre-Secondary Scholarship Exams Declared|महाराष्ट्र पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
पुणे, २४ एप्रिल २०२५ — महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल २५ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या निकालामध्ये शासकीय विद्यालय प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यालय प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यालय प्रवेश परीक्षा यांचा समावेश असून, निकाल परिषदच्या अधिकृत संकेतस्थळांवर www.mscepune.in आणि https://puppssmsce.in वर उपलब्ध आहे.
शाळांना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या शाळेच्या लॉगिनद्वारे विद्यार्थ्यांचे निकाल डाउनलोड करावेत व पालकांनाही निकाल पाहण्यासाठी मदत करावी.
विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव तसेच इतर माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास, शाळांनी ०४ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्जाद्वारे सुधारणा कराव्यात. त्यानंतर कोणतीही सुधारणा स्वीकारली जाणार नाही.
शाळांनी विद्यार्थ्यांच्या माहितीची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दिनांक ०४/०५/२०२५ पर्यंत संपर्क साधावा.
सुधारणा कालावधीनंतर अंतिम गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी वेळेत कार्यवाही करून निश्चित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जारी करणारे:
अनुराधा ओक
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे