‘शिक्षण सारथी’ योजना; २०००० मानधनावर निवृत्त शिक्षक मुलांना शिकवणार ,जाणून घ्या
राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास साडेबारा हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी झाली आहे. त्या शाळांवर २ किंवा ३ शिक्षक ठेवणे शिक्षण विभागाला परवडणारे नाही. दुसरीकडे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडत आहेत. त्यामुळे आता त्या शाळांवर एक-दोन वर्षाखाली सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना दरमहा २० हजार मानधन देऊन नेमण्याची भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे. आयुक्त कार्यालयाने नुकताच तसा प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या भरमसाट वाढली आहे. शहरी भागाबरोबरच, ग्रामीण भागातही त्याचे लोन पसरले आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या कसोटीवर न उतरलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सद्यःस्थितीत ३० हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांची पटसंख्या वाढलेली असतानाही त्याठिकाणी ३-४ वर्गासाठी १ किंवा २ शिक्षक आहेत, अशी वस्तुस्थिती आहे. हे व्यस्त प्रमाण कमी करून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी, पटसंख्या सुधारावी, यासाठी आता १० व २० पेक्षाही कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद न करता तेथील पूर्ण पगार घेणाऱ्या शिक्षकांना इतर शाळांची जबाबदारी दिली जाणार आहे.
तर त्या शाळांवर गावातीलच सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाणार आहे. गावातील असल्याने मानधन परवडेल आणि नियमित मुलांकडे व त्यांच्या गुणवत्तेकडेही लक्ष देता देईल, असे त्या प्रस्तावातून शासनाला पटवून देण्यात आले आहे.राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या भरमसाट वाढली आहे. शहरी भागाबरोबरच, ग्रामीण भागातही त्याचे लोन पसरले आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या कसोटीवर न उतरलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सद्यःस्थितीत ३० हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांची पटसंख्या वाढलेली असतानाही त्याठिकाणी ३-४ वर्गासाठी १ किंवा २ शिक्षक आहेत, अशी वस्तुस्थिती आहे. हे व्यस्त प्रमाण कमी करून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी, पटसंख्या सुधारावी, यासाठी आता १० व २० पेक्षाही कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद न करता तेथील पूर्ण पगार घेणाऱ्या शिक्षकांना इतर शाळांची जबाबदारी दिली जाणार आहे.
तर त्या शाळांवर गावातीलच सेवानिवृत्त शिक्षक नेमला जाणार आहे. गावातील असल्याने मानधन परवडेल आणि नियमित मुलांकडे व त्यांच्या गुणवत्तेकडेही लक्ष देता देईल, असे त्या प्रस्तावातून शासनाला पटवून देण्यात आले आहे.
'शिक्षण सारथी' म्हणजे काय?
निवृत्तीनंतर पण स्वतःच्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा तो शिक्षक व्यवस्थित चालवू शकेल, पटसंख्या कमी असल्याने तो शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी उत्तम प्रयत्न करेल, असा शालेय शिक्षण विभागाला विश्वास आहे. तसेच शिक्षक २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर नेमले जाणार आहेत. निवृत्तीनंतरही आपल्या गावातील मुलांसाठी कमी मानधनावर तो शिक्षक अध्यापन करेल, त्याला 'शिक्षण सारथी' योजना असे नाव देण्यात आले आहे.'Shikshan Sarathi' scheme; 20000 Retired teachers will teach children, know
काही ठळक बाबी...
- राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास ५१ हजार शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ३२ हजार पदे रिक्त
- १० व २० पेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यात १२ हजार २३१ शाळा; शाळा बंद न करता पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन
- एक- दोन वर्षाखाली सेवानिवृत्ती झालेल्या शिक्षकांना गावातच मिळणार ‘शिक्षण सारथी’मधून पुन्हा अध्यापनाची संधी
- कमी पटसंख्येच्या शाळांवर दरमहा २० हजार मानधनावर सेवानिवृत्ती शिक्षक नेमण्याचा शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शासनाला प्रस्ताव
- १५ जूनपूर्वी 'शिक्षण सारथी'च्या निर्णयाची अपेक्षा; दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांवरील नियमित शिक्षक बदल्यांच्या नियमात कोणताही बदल नाहीच