इयत्ता ५वी /८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ होणार दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी
{tocify} $title={Table of Contents}
दर वर्षा प्रमाणे या वर्षी २०२५-२६ मध्ये इयता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
या वेळी २०२6 ची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२६ (रविवार ) होणार आहे व ह्या साठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ पासून होत आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे असेल.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सर्व प्रथम शाळांना नोंदणी करावी लागेल
शाळा नोंदणी करणे करिता येथे क्लिक करावे .
शाळा नोंदणी केले नंतर आपल्याला प्राप्त लॉगीन व पासवर्ड च्या सहायाने लॉगीन व्हावे लागेल . व नंतर विद्यार्थ्याची आवेदन भारता येईल .
शाळा लॉगीन करिता येथे क्लिक करावे
online अर्ज भरण्याचे वेळापत्रक
|
शुल्क प्रकार |
कालावधी |
|
नियमित शुल्कासह |
२७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ |
|
विलंब शुल्कासह |
०१ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ |
|
अतिविलंब शुल्कासह |
१६ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२५ |

