4 डिसेंबर भारतीय नौदलाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस का आहे? जाणून घेऊया ..
1971 च्या
भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाचा दिवस भारतीय नौदलाच्या विजयाच्या उत्सव म्हणून
साजरा केला जातो. 3 डिसेंबर रोजी भारताच्या हवाई क्षेत्र आणि सीमा भागावर पाकिस्तानी
सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे 1971 च्या युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर पाकिस्तानला
योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन ट्रायडंट' सुरू करण्यात आले.
पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयाचे लक्ष्य ठेवून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. एक क्षेपणास्त्र नौका आणि दोन युद्धनौका यांचा समावेश असलेल्या हल्लेखोर गटाने कराचीच्या किनार्यावरील जहाजाच्या एका समुहावर हल्ला केला. या युद्धात प्रथमच जहाजावर अँटी-शिप मिसाईलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक जहाजे नष्ट झाली. या दरम्यान पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त झाले.
नेव्ही डे सेलिब्रेशनचे महत्व
1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकणार्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्य व शौर्याच्या स्मरणार्थ नेव्ही डे साजरा केला जातो. डिसेंबर, 1971 रोजी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या कारवाईचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.