पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती अपंग व्यक्तींसाठी
About Scheme
Department Name
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
Overview
- १. शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
२. विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करणे.
३. उच्च शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
४. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
५. पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
६. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचे फायदे केवळ दिव्यांग व्यक्तींना मिळतील.
Benefits
- या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :
१. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट अ, गट ब, गट क, गट ड, गट इ प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : ५५०
गट ब : ५३०
गट क : ५३०
गट ड : ३००
गट इ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : १२००
गट ब : ८२०
गट क : ८२०
गट ड : ५७०
गट इ : ३८०
२. अंध : वाचक भत्ता (अतिरिक्त):
गट अ, ब, क : १००
गट ड : ७५
गट इ : ५०
३. देखभाल भत्त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे
४. व्यावसायिक किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करण्यासाठी अतिरिक्त रु. ५००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते. (अभ्यास दौरा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग असणे आवश्यक आहे.)
५. जर प्रकल्प अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असेल तर छपाई आणि टायपिंगसाठी उमेदवारास अतिरिक्त रु. ६००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते, परंतु त्यासाठी प्राचार्य प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
६. एम. फील आणि पीएचडी अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण गट अ, गट ब, गट क नुसार देखभाल भत्ता प्रदान करण्यात येईल.
७. महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या महिन्याचा देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील.
Eligibility
- • विद्यार्थी विकलांग व्यक्ती असावा. (४०% किंवा जास्त)
• विद्यार्थी महाराष्ट्र राजयाचा आदीवासी असावा.
• विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून शिक्षण घेणारा असावा.
• विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास संबंधित शिष्यवृत्ती नाकारण्यात येईल. (अपूर्ण अभ्यासक्रम)
• उच्च माध्यमिक / माध्यमिक / पदवी या क्रमाने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दोनदा किंवा दुसऱ्या वेळेला लागू होणार नाही. (अर्ज चढत्या क्रमाने असावा) (एका वेळेला एकच अभ्यासक्रम लागू होईल)
• महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत शिक्षण घेणारे, परंतु महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणारे विद्यार्थी
• वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि संस्थेच्या बाहेर सर्व करण्याची परवानगी नसलेले विद्यार्थि पात्र असतील. (जसे की, छात्रवृत्ती लागू असलेली इंटर्नशिप किंवा हाऊसमनशिप)
• कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम खंडित करून इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असेल तर असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
गट अ वगळता उमेदवारास शिष्यवृत्ती लागू होणार नाही
गट ब, क, ड, ई - विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास या योजनेसाठी तो / ती अपात्र ठरेल.
• गट अ : पहिल्या प्रयत्नात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरीही या योजनेसाठी तो पात्र असेल. परंतु संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत दुसऱ्या वेळेला तो अनुत्तीर्ण झाला, तर या योजनेसाठी तो अपात्र ठरेल.
• दूरस्थ शिक्षण पद्धतीने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमार्फत ना परतावा शुल्क भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि साहित्य खरेदीसाठी वार्षिक रु. ५००/- देण्यात येतात.
• या योजनेसह उमेदवार फक्त राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
• अर्जदार पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी करत असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नाही.
• शासकीय वसतिगृहात राहणारा आणि पुस्तके आणि स्टेशनरी न मिळणारा विद्यार्थी
Renewal Policy
Documents Required
- • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
• अधिवास प्रमाणपत्र
• अपंगत्व प्रमाणपत्र
• पालक प्रमाणपत्र
• (फक्त गट अ साठी) जर शिक्षणामध्ये खंड असेल तर त्या संबंधित आवश्यक प्रमाणपत्र
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक
करा
· जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर
क्लिक करा