सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.
About Scheme
Department Name
कौशल्य विकास रोजगार विभाग
Overview
- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग) विद्यार्थ्यांसाठी आणि केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे सरकारी आयटीआय आणि खासगी आयटीआय मधील पीपीपी योजनेंतर्गत जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण फी प्रतिपूर्ती योजना. सदर योजनेचा निकष पूर्ण करीत असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.
Benefits
- खालील प्रमाणे प्रदान केलेले लाभः
१. कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त आणि ०८ लाख किंवा ०८ लाखांपेक्षा कमी असल्यास - ८० % ( खाजगी संस्था कोर्स फी - शासकीय संस्था कोर्स फी).
२. कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० किंवा त्याहून कमी असल्यास - १००% (खाजगी संस्था कोर्स फी - शासकीय संस्था कोर्स फी).
Eligibility
- १. कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी ITI संस्थेत पीपीपी योजनेद्वारे आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा
२. मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
3. विद्यार्थी मुक्त (ओपन) श्रेणी आणि आर्थिक दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस) चा असावा.
४. एकूण कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जाईल (वडील + माता एकूण उत्पन्न)
५. अनाथ उमेदवारास शिफारस पत्र आवश्यक आहे.
६. उमेदवाराने यापूर्वी शासकीय किंवा खासगी आयटीआय कडून कोणताही लाभ घेतलेला नसावा.
७. राज्य / केंद्र सरकार / विभाग / स्थानिक संस्था / कंपनी किंवा कॉर्पोरेशन प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवारांनी कोणताही लाभ घेतलेला नसावा.
८. महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
९. डीजीटी, नवी दिल्ली किंवा एमएससीव्हीटी मंजूर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
१०. लाभ फक्त २ मुलांना लागू आहेत.
११. उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
१२. उमेदवाराला प्रत्येक सहामाई / वार्षिक परीक्षेस हजेरी लावणे आवश्यक आहे. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन असल्यास संस्थेच्या संस्थेच्या प्रादेशिक सहसंचालकांनी केलेली प्रमाणित शिफारस आवश्यक.
१3. गैरप्रकारांमुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती- शैक्षणिक वर्षातील अपयश, उपस्थितीचे निकष न पाळल्यास आढळल्यास उमेदवार शिष्यवृत्तीस पात्र ठरणार नाही.
Renewal Policy
Documents Required
- शासन निर्णया नुसार आवश्यक कागदपत्रे
१· आधार कार्ड
२· रेशन कार्ड
3· मार्कशीट दहावी / बारावी
४· नूतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
५· महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
६· सक्षम प्राधिकरणाद्वारे मिळकत प्रमाणपत्र
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा