डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
About Scheme
Department Name
उच्च शिक्षण संचालनालय
Overview
- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय / अशासकीय अनुदानित / अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान- विना अनुदान) / कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देय आहे.
Benefits
अ.क्र. | प्रकार | कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा | वसतिगृह ठिकाण | अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्याची रक्कम | प्रत्येक जिल्ह्यासाठीचा संच |
---|---|---|---|---|---|
व्यावसायिक अभ्यासक्रम | |||||
01 | ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत. | निरंक | मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर इ. | रु. 30,000/- | अमर्याद |
इतर शहरे / ग्रामीण भागासाठी | रु. 20,000/- | ||||
02 | इतर विद्यार्थ्यांसाठी | रु. 1.00 लाखापर्यंत | मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर इ. | रु. 10,000/- | अमर्याद |
इतर शहरे / ग्रामीण भागासाठी | रु. 8,000/- | ||||
03 | इतर विद्यार्थ्यांसाठी | रु. 1.00 लाख ते रु. 8.00 लाख | मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर इ. | रु. 10,000/- | 500 |
इतर शहरे / ग्रामीण भागासाठी | रु. 8,000/- | ||||
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम | |||||
04 | विद्यार्थी | रु. 1.00 लाखापर्यंत | - | रु. 2,000/- |
Eligibility
- (शासन निर्णय दिनांक 7.10.2017, २२.०२.२०१८ ,११.०७.२०१९)
1. विद्यार्थ्याने शासकीय / निमशासकीय / खाजगी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्याने त्याबाबतचा पुरावा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
2. तसेच खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वत:ची राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा नोटराईज्ड भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
3. एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील शहरातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
4. सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यत मर्यादित आहे.
5. एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ मिळण्यास अपात्र आहे.
6. विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधीकरीताच निर्वाहभत्ता देण्यात येतो. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अथवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्यास त्या वर्षापुरता निर्वाह भत्ता लाभ अनुज्ञेय नाही.
7. या योजनेअंतर्गत रुपये 1.00 लाखपर्यत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्याकरीता निर्वाहभत्त्याचा लाभ देण्याकरीता संख्येची कोणतीही मर्यादा असणार नाही. मात्र रुपये 1.00 लाख ते रुपये 8.00 लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक जिल्हयासाठी लाभार्थी विद्यार्थ्याची कमाल संख्या 500 इतकी निश्चित करण्यात येत आहे. त्यापैकी 33 टक्के इतक्या जागा विद्यार्थिनीकरीता राखीव ठेवण्यात येतात. तथापि पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्हयातील विद्यार्थ्याकरीता उपयोगात आणता येतात.
8. प्रत्येक जिल्हयातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार प्रमाणशीररित्या (Proportionate) निश्चित करण्यात येतो.
9. सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
Renewal Policy
- 1. मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
Documents Required
- 1. सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
2. पालकांचे अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर असलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा
3. शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
4. CAP संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम )
5. गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)
6. दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र.
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
·
आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
·
आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
·
प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
·
लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर
क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास,
"पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास,
"वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा