इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
About Scheme
Department Name
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
Overview
- * विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
* शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
* विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
* केवळ विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
Benefits
- १. इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ३००/- (१० महिन्यांसाठी) म्हणजेच प्रति वर्ष रु. ३०००/- याप्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
२.अर्जदार या योजनेसोबत शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा लाभ घेऊ शकतो.
Eligibility
- १. अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
२. अर्जदार कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व १२ वी शिकत असावा.
३. सदर शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
४. अर्जदाराने शालांत परीक्षेत ७५% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
५. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सोबत या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
६. या शिष्यवृत्तीसाठी शिक्षणात कोणताही खंड नसावा.
७. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
Renewal Policy
- • अर्जदार 11 वी ची परीक्षा उत्तीर्ण असावा.
Documents Required
- १. जात प्रमाणपत्र - सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले)
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा
२. १० वी किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
३. शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र