भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
About Scheme
Department Name
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
Overview
- १. शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
२. शिक्षण गळती कमी करण्यासाठी.
३. उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
४. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
५. पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
६. फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
७. अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 2,50,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
Benefits
- या योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील :
१. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : ५५०
गट २ : ५३०
गट ३ : ३००
गट ४ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : १२००
गट २ : ८२०
गट ३ : ५७०
गट ४ : ३८०
शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे :
अपंगत्वाचे प्रकार : (दरमहा रुपयांमध्ये)
अंधत्व / कमी दृष्टी गट १ आणि २ : १५०
गट ३ : १२५
गट ४ : १०० शासन निर्णय (अ) नुसार अतिरिक्त भत्ते
कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/- अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
कर्णबधीर सर्व गटांसाठी.
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी :
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी:
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/-
४. अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता १५० / - अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे
ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी:
१. वाहतूक भत्ता १०० / - पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
२. एस्कॉर्ट भत्ता १०० / -
३. वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता. १०० / - अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
३) विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.
Eligibility
- १. आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
२. विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
३. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
४. विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
५. अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
६. महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
७. फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी.
Renewal Policy
Documents Required
- • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)
• जात प्रमाणपत्र.
• गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
• १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका
• वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
• शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
• वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
• पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
·
आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
·
आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
·
प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
·
लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर
क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास,
"पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास,
"वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा