अल्पसंख्याक शिष्यवृत्ती.
About Scheme
Department Name
अल्पसंख्याक विकास विभाग
Overview
- ही योजना मुस्लिम, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी, ज्यू या धर्मीयांसाठी आहे
Benefits
- एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा रु. २५,००० यांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात येईल
Eligibility
- 1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न अभ्यासक्रम आणि एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच,बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, बीपीएमटी,ऑप्थाल्मिक सहाय्यक, ऑप्टोमेटरी, पीबी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी
2. कौटुंबिक उत्पन्न रु. 8,००,००० किंवा त्यापेक्षा कमी
3. अभ्यासक्रम प्रवेश CET / स्पर्धात्मक परीक्षा / बारावी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे.
4. ३०% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. ७०% विद्यार्थ्यांची एकत्रित (सयुंक्त) यादी तयार केल्यानंतर ३०% मुली शिष्यवृत्तीसाठी निवडल्या जातात ७०% यादीत समावेश नसतो
5. अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे
6. विशिष्ट अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव शिष्यवृत्ती रक्कम वितरणाचे लक्ष्य साध्य झाले नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीत समाविष्ट करण्यात येईल.
7. ही शिष्यवृत्ती महाराष्ट्राबाहेर जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू असेल, परंतु तो / ती १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
१. संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
२. एफआर प्रत
३. चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
Renewal Policy
Documents Required
- 1. शाळा सोडल्याचा दाखला
2. नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. (नूतनीकरणासाठी लागू नाही)
3. पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र / अर्ज क्रमांक 16
4. उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्रात स्पष्टपणे नमूद केलेले असावे की उमेदवार अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित आहे.
5.अधिवास प्रमाणपत्र
6.विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
7.वडिलांचे पॅन कार्ड
8.आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
9. वडिलांचे आधार कार्ड
10.आईचे आधार कार्ड (पर्यायी)
11.जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर :
१. संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
२. एफआरए प्रत
३. चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा