एकलव्य आर्थिक सहाय्य
About Scheme
Department Name
उच्च शिक्षण संचालनालय
Overview
- राज्य शासनाकडून होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एकलव्य आर्थक सहाय्य योजना सुरु करण्यात आलेली आहे.
Benefits
- (शासन निर्णय दिनांक 07.02.1996)
सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थांना प्रतिवर्ष रु 5000/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
Eligibility
- (शासन निर्णय दि. 07.02.1996 व 5.02.2004)
1.कला , वाणिज्य , विधी व शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 70 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
2.विद्यार्थांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 75,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
3.विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
4.संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
5.शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.
6.अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
7.बी .एड. प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम.फील व पी.एच.डी व तत्सम अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू नाही.
8.सदर शिष्यवृत्ती मंजुर झाल्यास इतर केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
9.महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
Renewal Policy
- 1. नियमित उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.
2. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षी किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
3. नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
Documents Required
- 1. सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
2. शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3. मागील वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे .
4. नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा