इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
About Scheme
Department Name
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
Overview
- • शिक्षणामध्ये रुची निर्माण करणे.
• शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
• उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
• पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
• संबंधित इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्कांचा लाभ दिला जातो.
Benefits
- १. दि. १२/०३/२००७ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदारास सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क, जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर लागू शुल्क यांचा लाभ प्रदान करण्यात येईल. सन २००६-०७ पासून शासकीय, शासन मान्यताप्राप्त खाजगी, विना-अनुदानित आणि कायमस्वरूपी विना-अनुदानित महाविद्यालयातून CAP फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी शिक्षण शुल्क समितीद्वारे मंजूर केलेल्या शिक्षण आणि परीक्षा शुल्काचा ५०% लाभ प्रदान करण्यात येईल.
२. शासकीय / अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या अर्जदारांस शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
३. खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या अर्जदारांस शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा ५०% लाभ प्रदान करण्यात येईल.
४. ज्या अर्जदारांनी Deemed विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्यांना हि शिष्यवृत्ती / freeship लागू होणार नाही.
५. अर्जदाराने महाविद्यालयात / संस्थेत प्रवेश घेतलेल्या तारखेनुसार अर्जाची प्रारंभ तारीख निश्चित केली जाईल आणि परीक्षेची शेवटची तारीख हि अर्जाची अंतिम तारीख म्हणून निश्चित केली जाईल. (१० महिन्यांसाठी - प्रवेशाच्या ताराखेमध्ये शैक्षणिक वर्षागणिक बदल होईल)
६. खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेच्या शुल्क संरचनेप्रमाणे असलेले शुल्क लागू असेल.
Eligibility
- १. अर्जदाराने मॅट्रिकोत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
२. पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
३. अर्जदार इमाव प्रवर्गातील असावा.
४. शासनाद्वारे मंजूर केलेल्या मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
५. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
६. अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ शासकीय अनुदानित / खाजगी विना अनुदानित / कायमस्वरूपी खाजगी विनाअनुदानित संस्थेत / महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
७. आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंतवैद्यकीय, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, व्यावसायिकोपचार, नर्सिंग):
खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये प्रवेश परीक्षा व्यवस्थापन असोसिएशन आणि सरकारी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी फ्रीशिप साठी पात्र असतील.
८. उच्च व तंत्र शिक्षण विभाग :
विना अनुदानित महाविद्यालये / तांत्रिक शिक्षण / तंत्रनिकेतन साठीची शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या शासकीय विना अनुदानित महाविद्यालयांसाठी फ्रीशिप लागू होईल.
• पदविका - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
• पदवी - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
• पदव्युत्तर - एमबीए / एमएमएस, एमसीए
९. शेती, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग:
शिष्यवृत्ती शुल्क हे खाजगी अनिवासी / कायम स्वरूपी अनुदानित संस्थेमध्ये शासकीय कोटातून प्रवेश मिळालेल्या अर्जदारांना लागू असेल.
• कृषी महाविद्यालये (पदविका)
• दुग्धव्यवसाय विभाग (पदविका)
कृषी आणि संबंधित विषयांसाठी महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
• कृषी आणि जैव-तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
• कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
१०. बी.एड. आणि डी.एड अभ्यासक्रमासाठी: डी.एड., बी.एड अभ्यासक्रमांसाठी १००% लाभ (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क) लागू आहे. डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क संरचना हि शासकीय दराप्रमाणे लागू राहील.
११. केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
१२. जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा लाभ मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
१३. अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
१४. जर एखाद्या अर्जदाराला २०१५-१६ च्या पासून पुढे खाजगी विना अनुदानित / कायम विना अनुदानित संस्थामध्ये प्रवेश दिलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक वेळा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास तो / ती फ्रीशिप साठी पात्र ठरणार नाही.
१५. कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत अर्जदारास शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ मिळेल. उदा. - ११ वी, १२ वी, कला - बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. जर अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला, तर एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. परंतु बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
१६. विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
Renewal Policy
- १. अर्जदाराने मागील वर्षाची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
२. अर्जदार एका वेळेस एकच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या फ्रीशिप साठी अर्ज करू शकतो आणि सदर फ्रीशिप तिला / त्याला विशिष्ट वेळेत शैक्षणिक कोर्स पूर्ण केल्यानंतरच लागू होईल.
३. अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट शैक्षणिक वर्षातील प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे [एका विशिष्ट वर्षातील तो / ती अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा लाभ दिला जाणार नाही].
४. अर्जदार 2 पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही.
५. इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
Documents Required
- १. जात प्रमाणपत्र - सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
२. उत्पन्न प्रमाणपत्र - सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
३. १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
४. अंतर प्रमाणपत्र - शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
५. एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
६. वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
७. CAP वाटप पत्र (फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी)
८. जात पडताळणी प्रमाणपत्र (दि. ३१ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी) निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सूट लागू होईल.
९. शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
१०. शिधापत्रिका - कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा