शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन — सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक दिनांक: 28 जुलै 2025
{tocify} $title={Table of Contents}
🔹 उद्दिष्ट:
सोशल मिडियाचा जबाबदारीने आणि शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन न करता वापर करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काही *मार्गदर्शक सूचना* जाहीर करण्यात आल्या आहेत.
✅ लागू होणारे कर्मचारी:
1. *सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी* (सरळ सेवा, कंत्राटी, किंवा बाह्यस्त्रोतांवर कार्यरत)
2. *स्थानीय स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे* व इतर सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचारी
🌐 सोशल मिडिया म्हणजे काय?
- फेसबुक, लिंक्डइन (नेटवर्किंग साइट्स)
- ट्विटर/X (मायक्रोब्लॉगिंग)
- इंस्टाग्राम, यूट्यूब (व्हिडिओ शेअरिंग)
- व्हॉट्सॲप, टेलीग्राम (तत्काळ मेसेजिंग)
- विकी, फोरम्स (सहकार्य टूल्स)
📝 मुख्य मार्गदर्शक सूचना
1. *सोशल मिडिया वापर करताना काळजी घ्या* — तुमच्या पोस्ट्समुळे शासकीय सेवा नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्या.
2. *वैयक्तिक व कार्यालयीन अकाऊंट वेगळे ठेवा* — सोशल मिडियावर वेगवेगळे प्रोफाइल ठेवा.
3. *शासनाने बंदी घाललेल्या अॅप्स/वेबसाईट्सचा वापर टाळा.*
4. *शासकीय माहितीचा प्रचार/प्रसार फक्त अधिकृत व्यक्तीकडून/संस्थेकडूनच करा* — वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक.
5. *व्हॉट्सॲप, टेलीग्राम* यांचा वापर फक्त कार्यालयीन कामकाजासाठी सहकार्य व संवाद साधण्यासाठीच करा.
6. *आपल्या यशाबद्दल पोस्ट करताना "स्वयंप्रशंसा" टाळा.*
7. *फोटो/व्हिडिओ पोस्ट करताना सरकारी संपत्ती (वाहन, इमारत इत्यादी) किंवा अधिकृत चिन्ह/लोगो वापरू नका.*
8. *खरं नसलेली, चुकीची, द्वेषयुक्त, मानहानीकारक माहिती पोस्ट करू नका.*
9. *गोपनीय सरकारी कागदपत्रे / फाईल्स शेअर करू नका.*
10. *सेवानिवृत्तीनंतर किंवा खातांतर्गत बदलानंतर अकाऊंट योग्य पद्धतीने हस्तांतरित करावं.*
⚠️ नियमभंग केल्यास:
❌ संबंधित कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत *शिस्तभंगाची कारवाई* केली जाईल.
👉 सूचना कुठे पाहता येतील?
ही संपूर्ण सूचना शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे. दस्तावेज क्रमांक: 202507281811487507
ह्या सूचनांचा उद्देश कर्मचाऱ्यांनी सोशल मिडियाचा वापर *जबाबदारीने व शासकीय नियमांनुसारच* करावा, हाच आहे. 🙏