
पायाभूत चाचणी चे गुण कसे व कोठे भरावे ?

पायाभूत चाचणी चे गुण कसे व कोठे भरावे ?
STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल.संबधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे.
{getButton}$text={click here for CHATBOT} $icon={preview} $color={Hex Color}
चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.