todays setu abhyas 8th july;class 2 to 8 |
आजचा सेतू अभ्यास pdf डाउनलोड करा (०८/०७/२०२३ )
todays setu abhyas 8th july;class 2 to 8
ब्रिज कोर्स (सेतू अभ्यास २०२३ ) एक विशेष कार्यक्रम आहे जो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर सहजतेने नेण्यास करण्यास मदत करण्यासाठी किंवा अभ्यासाच्या दोन क्षेत्रांमधील अंतर कमी करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. "ब्रिज" या शब्दाचा अर्थ असा आहे की हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या शैक्षणिक अवस्था किंवा विषयांमधील कनेक्शन किंवा दुवा म्हणून काम करतो.
उदाहरणार्थ, उच्च शिक्षणामध्ये, नियमित महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी ज्यांना गणित, लेखन किंवा गंभीर विचार या विषयातील कौशल्ये सुधारण्याची आवश्यकता आहे अशा येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स ऑफर केला जाऊ शकतो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता निर्माण करण्यास मदत करतो.
8 जुलै चा सेतू अभ्यास
इयत्ता |
आजचा सेतू
अभ्यास |
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
एकूणच, ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी एक संक्रमणकालीन साधन म्हणून काम करतात.
सेतू अभ्यास (२०२३ – २४) स्वरूप
१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.
२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.
४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.
६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.
७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.
सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी
करावयाची कार्यवाही | अंमलबजावणी कालावधी |
पूर्व चाचणी | दि. ३० जून ते ३ जुलै २०२३ |
२० दिवसांचा सेतू अभ्यास | दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३. |
उत्तर चाचणी | दि.२७ ते ३१ जुलै २०२३. |