Fill out the form along with the regular fee by 20th December
20 डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह फॉर्म भरा
{tocify} $title={Table of Contents}
![]() |
logo of mscert pune |
परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, २०२२ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. २० डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. २० डिसेंबर, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत देण्यात आली आहे.
खालील प्रमाणे नवीन वेळापत्रक असेल
अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे संकेत स्थळ https://2023.mscepuppss.in/startpage.aspx ला भेट द्या .