Class 5th and 8th Scholarship Exam will be held on 31st July 2022
इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा होणार ३१ जुलै २०२२ रोजी
{tocify} $title={Table of Contents}
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, दर वर्षी इयत्ता ५वी व ८वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते.महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागापासून ते शहरी भागा पर्यंत च्या विद्यार्थ्या साठी ही परीक्षा आयोजित केली जाते.
कोरोंना काळापूर्वी ही परीक्षा सुरळीतपने फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आयोजित केली जात असे पण कोरोंना च्या प्रादुर्भावमुळे परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये सतत बदल होत होता. या वर्षी ही असाच प्रकार पाहावयास मिळतो . सदर परीक्षा दिनांक २० जुलै रोजी होणार होती त्या करिता प्रवेश पत्र देखील परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेला होता ,प्रवेश पत्र मध्ये परीक्षेचा दिनांक २०जुलै २०२२ होता .
पण राज्यात अतिवृष्टी मुळे पुरपरिस्थिति निर्माण झाली आहे व ह्या कारणाने ज्या भागात अतिवृष्टी होत आहे त्या ठिकाणचे विद्यार्थी सदर परीक्षेला मुकतील . ह्या करणाने परीक्षा परिषद पुणे ने ही तारीख बदलून दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्याचे निर्णय घेतले आहे.
प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करा. {alertSuccess}
परीक्षे करिता प्रवेशपत्र डाउनलोड करा (शाळा लॉगिन वरून){alertInfo}
विद्यार्थ्यांसाठी सूचना:
- परीक्षार्थ्याने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड -19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, सॅनिटायझर,सोशल डिस्टंसिंग इत्यादी) पालन करून सकाळी 10:00 वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहावे.
- परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.
- उत्तरे नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. |
- परीक्षार्याने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.
- पेपर चालू असताना प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी चर्चा करू नये.
- कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, टॅब, पेजर व तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
- उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा.
- परीक्षार्थ्याने पेपर संपल्यानंतर कार्बनलेस उत्तरपत्रिकेची मूळ प्रत (Original Copy) पर्यवेक्षकाकडे जमा करावी तसेच उमेदवाराची प्रत ___(Candidate Copy) व प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घेऊन जावी.
- उत्तरपत्रिकेवर प्रश्रपत्रिका संचकोड अचक नोंदवन त्याबाबतचे अचूक वर्तळ रंगविणे आवश्यक आहे.
- उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही अथवा चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.
- उत्तरपात्रका फाटल्यामुळ उत्तरपात्रकवर रगावलल पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नाच गुण दिले जाणार नाहात.
इयत्ता ५वी /८वी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम इयत्ता ५वी/८वी शिष्यवृत्ती प्रश्न पत्रिका २०१८, २०१९
शाळा व पालकांसाठी सूचना:
- प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत काही अडचण असल्यास परीक्षेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षण विभागाशी (शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई म.न.पा./ शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई ( प./द./उ.) / प्रशासन अधिकारी म.न.पा./गटशिक्षणाधिकारी पं.स.)संपर्क साधावा.
- परीक्षार्थ्यांकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.
- प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी / चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच भरून पाठवावे.
- परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करणे → आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे → अंतरिम ___(तात्पुरता) निकाल घोषित करणे → त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे.
- प्रवेशपत्रावरील शाळेच्या अथवा परीक्षार्थ्याच्या माहितीत काही दरुस्ती असल्यास संबंधित मख्याध्यापकाच्या पत्रान्वये तात्काळ परीक्षा परिषदेस __ कळवावे. जेणेकरून निकालापूर्वी आवश्यक बदल करता येईल. अंतिम निकालानंतर कुठलीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात.
- प्रवेशपत्र व उत्तरपत्रिकेची Candidate Copy परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवावी.
Class 5th and 8th Scholarship Exam will be held on 31st July 2022
![]() |
Class 5th and 8th Scholarship Exam will be held on 31st July 2022 |