राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
(NMMS) २०२०-२१
इ. ८ वी परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता
१६/४/२०२१ ते २३/४/२०२१
रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे
मंगळवार दिनांक ०६ एप्रिल २०२१ घेण्यात आलेल्या परीक्षेचे अंतरिम संभाव्य
उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतरिम संभाव्य उत्तरसूची
http://www.mscepune.in/ व https://nmms.mscescholarshipexam.in/ संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत
1. या उत्तर सूची वर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल
2. त्याच्या साठी खालील लिंक देण्यात येत आहे त्यावर क्लिक करून आपले आक्षेप नोंदवू शकता
3. सदर ऑनलाइन निवेदन शाळां करिता त्यांच्या लोगिन मध्ये डॅशबोर्ड वरील डाव्या बाजूस query > management > या हेडिंग खाली व पालकांसाठी https://nmms.mscescholarshipexam.in/
या संकेतस्थळावर query > question paper > interim answer key या हेडिंग खाली स्वतंत्र रिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत
4. त्रुटी किंवा आक्षेप बाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक १६ एप्रिल २०२१ ते २३ एप्रिल २०२१ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे
5. दिनांक २३ एप्रिल २०२१ नंतर त्रुटी किंवा आक्षेप बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही
6. उपरोक्त ऑनलाइन निवेदन शिवाय इतर कोणत्याही प्रकारे म्हणजे टपाल ,समक्ष ,अथवा इमेल द्वारे प्राप्त त्रुटी किंवा आक्षेप बाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही
7. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिक रित्या उत्तर पाठविले जाणार नाही
8. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल परिषदेचे संकेतस्थळ खाली दिलेले आहे
https://nmms.mscescholarshipexam.in/
हे हि पहा
download hall ticket for JNVST Maharashtra exam date 16 may 2021
2021 madhe google pay barobar surakshit payment kase karal? You must have to know