आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन ( International Anti-Corruption Day )
भ्रष्टाचार ही एक जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटना आहे जी सर्व देशांवर परिणाम करते.
भ्रष्टाचार लोकशाही संस्था अधोगती करते, आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेला हातभार लावते. संयुक्त राष्ट्र संघ
9th डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय लाचलुचपत
प्रतिबंधक दिन म्हणून पाळत आहे.
informational video by A.C.B. Maharashtra
महासंचालकांचा (महाराष्ट्र राज्य ) संदेश
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,
महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा.
लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध
कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये
घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल. समाजाला
भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज
आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
श्री. रजनिश सेठ, भा.पो.से.,
महासंचालक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य.