आपण फेसबूक वापरत असाल ! व आपण ही सेटिंग केली नसेल तर कदाचित आपल्या फेसबूक चे गैर वापर (हॅक )होऊ शकेल.
सावधान ! लॉकडाउन च्या काळात
ऑनलाइन फ्रोड चे प्रमाण वाढत चाललेले आहे. फेसबूक आपल्या परीने हवी ती काळजी ( मोबाइल एप्प
अपडेट ) करीत असते ,
काय आपण ती काळजी / खबरदारी
घेत आहात ?
फेसबूक ने एक महत्वाची सेटटिंग
दिलेली आहे ज्याला ( two factor authentication
) असे नाव दिलेले आहे.
ही सेटटिंग कश्या प्रकारे
ऑन ( सुरू ) शकतो ते आपण पाहणार आहोत.
१ ) सर्व प्रथम आपले फेस बुक एप्प अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यावे व जेव्हां जेव्हा अपडेट उपलब्ध होईल तेव्हा आपण आपले एप्प अपडेट करत राहावे ( सेक्युर्टी च्या दृष्टीकोणातून )
चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे आपले फेसबूक सुरू केल्या नंतर वरील बाजूस तीन रेषा दिसत आहेत त्याच्या वर क्लिक करावे.
२) खाली दाखवल्या प्रमाणे
सेटटिंग आणि प्रायवसी ( setting and privacy ) वर क्लिक करावे.
३) सेटींग वर क्लिक करावे
..
४) येथे सर्व प्रथम security and login मध्ये आपले फेस बुक कोठे कोठे
लॉगिन आहे ते पहावे. ( जर तेथे आपले मोबाइल व pc व्यतिरिक्त दुसरे
मोबाइल किंवा pc दाखवत
असेल तर आपले पासवर्ड बदलावे )
two factor authentication चे उपयोग व फायदे .
आपण two factor
authentication सेट केल्यास, कोणी अनोळखी व्यक्ति
त्याच्या मोबाइल वरुन तुमचा फेसबूक लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यास (गैर प्रकार करण्याचा
प्रयत्न केल्यास ) प्रत्येक वेळी एक विशिष्ट otp फक्त तुमच्या
मोबाइल नंबर ( जो तुम्ही two factor authentication करताना समाविष्ट
केलेला असेल ) प्राप्त होईल , ज्या मुळे गैर प्रकार करणारा व्यक्ति
तुमच्या फेसबुक अकाऊंट शी छेडछाड ( गैरप्रकर ) करू शकणार नाही .
जेव्हा एखादा ब्राउझर किंवा
तुम्ही ओळखत नाही अशा मोबाइल डिव्हाइसवरून
लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अॅलर्ट देखील मिळवू शकता.
५) खालील चित्रात दाखवल्या
प्रमाणे text message ( sms ) पुढील
टिंब वर सिलेक्ट करून खाली continue वर क्लिक करावे.
त्या नंतर लॉगिन करते वेळी ज्या मोबाइल नंबर वरुन
लॉगिन केलेला असेल तो मोबाइल नंबर दाखवेल तो
निवडावा किंवा तुम्ही त्या व्यतिरिक्त दूसरा मोबाइल न. देखील समाविष्ट करू शकता.
मोबाइल नंबर आपल्या सोबत ठेवा कारण नंतर च्या स्टेप
मध्ये एक otp आपण समाविष्ट केलेल्या
नंबर वर येईल.
demo video
६) खाली दाखविल्या प्रमाणे
आपल्या मोबाईल वर आलेला otp दाखल
करा.
अश्या प्रकारे आपला two factor authentication सुरू झाल अस समजावे.
*अतिरिक्त माहिती*
खाली दाखवल्या प्रमाणे recovery codes वर क्लिक करावे.
याने काय होईल ?
1)ही प्रक्रिया केल्याने जर आपले मोबाइल
हरवले व आपण आपला पासवर्ड विसरलात व otp प्राप्त करण्या करिता अडचण निर्माण होईल अश्या वेळी ही प्रक्रिया
केल्याने सहज रित्या नविन मोबाईल वर सहज रित्या लॉगिन करू शकाल.
2)फेसबुकवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी फेसबुकने
फेसबुक रिकव्हरी कोड नावाचे एक नवीन फीचर आणले. फेसबुक रिकव्हरी कोड पर्यायाच्या मदतीने, जर आपणास फेसबुक वरून ओटीपी मिळत नसेल
तर आपण सहजपणे आपल्या फेसबुक खात्यात प्रवेश करू शकाल.
७) अश्या प्रकारचे 6 code प्राप्त होईल. हे कोड्स आपण जतन करून
ठेवा .लॉगिन करण्यात अडचण आल्यास प्रत्येक वेळी एक कोड च उपयोग आपण करू शकता.
अश्या प्रमाणे आपण आपले फेसबूक सिक्युर करू शकता.
महत्वाचे ( फेसबूक चे पासवर्ड दर सहा महिन्यांनी बदलत राहावे , व शक्य होईल तेवढे अवघड पासवर्ड ठेवावे)