
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला
नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
दीक्षा एप्प डाउनलोड करा
दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल 2020 दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर Submit केली की लगेच आपल्यासमोर View Score असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.
प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.
1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.
Stay home, stay safe!
अभ्यासासाठी शुभेच्छा!